कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक विशाळगडास तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा घोषित करण्यात आला आहे. या संदर्भातील अध्यादेशही काढण्यात आला आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रांना ‘ब ’वर्ग दर्जा देण्यासाठी शासनास प्राप्त झालेले प्रस्ताव राज्य आणि निकष समितीच्या विचारार्थ ४ नोव्हेंबरच्या बैठकीत सादर करण्यात आले होते. समितीने निकषाप्रमाणे प्रस्तावातील कागदपत्रांची पडताळणी करून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील, तसेच खासदार धैर्यशील माने यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.
‘ब’ वर्ग प्राप्त केलेली अन्य तीर्थक्षेत्रे !
शाहूवाडी तालुक्यातील जुगाई देवी मंदिर, हातकणंगले तालुक्यातील गजानन महाराज मंदिर (खोतवाडी), शिरोळ तालुक्यातील श्री संतुबाई देवालय (हेरवाड), राधानगरी तालुक्यातील श्रीक्षेत्र अंबाबाई देवालय, बारडवाडी येथील स्वामी समर्थ देवालय, करवीर तालुक्यातील वडणगे येथील पार्वती, निगवे येथील श्री नरसिंह सरस्वती मंदिर, बालिंगे येथील श्री महादेव मंदिर, भुुदरगड तालुक्यातील शेणगाव येथी श्री दत्त मंदिर यांचा समावेश आहे.