नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके सिद्ध करतांना वर्णमालेसंदर्भातील नियमांनुसार पालट करता येईल ! – बालभारती

वर्णमालेसंदर्भात नव्या नियमांचा स्वीकार केल्याचे प्रकरण

पुणे – देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला आणि अंक यांचा शासनाने स्वीकार केल्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. वर्ष २००९ मध्ये देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला आणि अंक स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यावर बालभारतीने त्याला विरोध केला होता. सध्याच्या नवीन नियमांनुसार बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील म्हणाले, ‘‘आता लगेच पाठ्यपुस्तकांमध्ये पालट करणे शक्य नाही; मात्र नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके सिद्ध करतांना त्यात पालट करता येऊ शकतो. शालेय शिक्षणमंत्री अध्यक्ष असलेल्या बालभारतीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ.’’