टिटवाळा रेल्वे स्थानकात रेल्वे विलंबाने आल्यामुळे संतप्त प्रवाशांचे ‘रेल्वे बंद’ आंदोलन !

टिटवाळा रेल्वे स्थानकात रेल्वे विलंबाने आल्यामुळे संतप्त प्रवाशांचे ‘रेल्वे बंद’ आंदोलन

ठाणे, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – टिटवाळा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी सकाळी ८.३० वाजता ‘रेल्वे बंद’ आंदोलन केल्यामुळे मध्य रेल्वेमार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणार्‍या लोकल विलंबाने धावत होत्या. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय झाली.