ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. सुहास परचुरे यांचे पुणे येथे वृद्धापकाळाने निधन !

डॉ. सुहास परचुरे

पुणे – संपूर्ण हयात आयुर्वेदाच्या उत्कर्षासाठी खर्च करणारे सेवाव्रती, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य, ज्येष्ठ वैद्य डॉ. सुहास परचुरे (वय ७७ वर्षे) यांचे १५ नोव्हेंबर या दिवशी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी ‘नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन’ (‘निमा’)ची स्थापना केली होती. निमा, तसेच आयुर्वेद रसशाळेच्या राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, ताराचंद धर्मार्थ आयुर्वेद महाविद्यालय आणि हॉस्पिटलचे माजी व्यवस्थापकीय संचालक यासह अनेक पदे त्यांनी भूषवली होती.