नोएडा (उत्तरप्रदेश) येथे पाळीव कुत्रा चावला, तर मालकाला होणार १० सहस्रांचा दंड !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – १ मार्च २०२३ पासून उत्तरप्रदेशातील नोएडामध्ये एखाद्याचा पाळलेला कुत्रा कुणाला चावला, तर मालकाला जागीच १० सहस्र रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच ज्याला कुत्रा चावला, त्या व्यक्तीच्या औषधोपचारांचाही व्यय (खर्च) करावा लागणार आहे.

नोएडा भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाळीव कुत्र्यांनी नागरिकांवर आक्रमण करून त्यांचे चावे घेतल्याच्या वाढत्या घटना घडत आहेत. या संदर्भात नोएडा प्राधिकरणाकडे असंख्य तक्रारी आल्या होत्या. त्यावर प्राधिकरणाने अशा प्रकारे कठोर भूमिका घेतली आहे. नवीन नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी पाळीव कुत्र्यांनी केलेली घाण स्वच्छ करण्याचे दायित्वही कुत्र्याच्या मालकाचेच असणार आहे.

संपादकीय भूमिका

  • असा निर्णय सर्वत्रचेच सरकार का घेत नाही ?