काश्मीरमध्ये पाकने पाठवलेल्या ड्रोनचा पोलीस घेत आहेत शोध !

कठुआ (जम्मू-काश्मीर) – येथे स्थानिक नागरिकांनी पाकमधून आलेला ड्रोन पाहिल्यानंतर त्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या ड्रोनचा शोध चालू केला आहे. पाककडून ड्रोनच्या माध्यमांतून काश्मीरमधील जिहादी संघटनांच्या आतंकवाद्यांसाठी शस्त्रसाठा, तसेच अमली पदार्थ पाठवण्यात येतात. पंजाबमध्येही पाक असाच प्रकार करत असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.

संपादकीय भूमिका

पाकच्या या कुरापती कायमच्या थांबवण्यासाठी कधी प्रयत्न होणार ?