ताजमहालापासून ५०० मीटरच्या अंतरावरील व्यावसायिक दुकाने हटवावीत – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने आगरा विकास प्राधिकरणाला ताजमहालापासून ५०० मीटरच्या अंतरावरील सर्व व्यावसायिक दुकाने हटवण्याचे निर्देश दिले. ताजमहालपासून ५०० मीटर त्रिज्याबाहेर जागा वाटप केलेल्या दुकान मालकांच्या गटाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.

या प्रकरणी ‘न्यायालय मित्र’ म्हणून न्यायालयाला साहाय्य करणारे ज्येष्ठ अधिवक्ता ए.डी.एन्. राव यांनी न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती अभय एस्. ओका यांच्या खंडपिठासमोर सांगितले ‘‘ताजमहाल एक जागतिक वारसास्थळ आहे. ताजमहालाच्या जवळील सर्व व्यावसायिक दुकानांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले पाहिजे.  ताजमहालजवळ अवैध व्यावसायिक कामे केली जात असल्यामुळे न्यायालयाने यापूवी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.’’