रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात पू. रेखा काणकोणकर यांच्या माध्यमातून साक्षात् अन्नपूर्णामातेच्या कृपाशीर्वादाखाली सर्व साधक वावरत असल्याची प्रचीती येणे 

श्रीमती भाग्यश्री आणेकर

मी वाराणसी आश्रमात सेवा करते. काही कालावधीसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात वास्तव्यास होते. एकदा मी अन्नपूर्णादेवीला नमस्कार करून प्रार्थना केली, ‘हे जगदंबे, तुझ्या महाप्रसादातील सर्व पदार्थ मला खाता येऊ देत.’ त्या वेळी ‘माझ्या पायांखालील भूमी वर-खाली होत आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हा रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णादेवी (पू. रेखाताई (पू. रेखा काणकोणकर) माझ्यासमोर उभ्या होत्या. त्या वेळी मला वाटले, ‘पू. रेखाताईंच्या माध्यमातून अन्नपूर्णामाता सर्वांकडून अविरतपणे कार्य करवून घेण्यासाठी उभी आहे.’ मला पू. रेखाताई यांच्यात अन्नपूर्णादेवीचे अस्तित्व जाणवले. ‘पू. रेखाताईंच्या कृपाशीर्वादाखाली नाही, तर साक्षात् अन्नपूर्णामातेच्या कृपाशीर्वादाखाली येथील सर्व साधक वावरत असतात’, याची मला प्रचीती आली.

– श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे), वाराणसी आश्रम (१३.२.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक