हलाल जिहादच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे ! – शामसुंदर सोनी, सभापती, अखिल भारतीय माहेश्वरी महासभा

नागपूर येथे हिंदु जनजागृती समिती प्रकाशित ‘हलाल जिहाद’ ग्रंथाचे लोकार्पण !

‘हलाल जिहाद’ ग्रंथाचे लोकार्पण करतांना डावीकडून अधिवक्ता रमण सेनाड, श्री. शामसुंदर सोनी आणि श्री. सुनील घनवट

नागपूर, २२ सप्टेंबर (वार्ता.) – माहेश्वरी समाज हा संघटित आणि जागरूक समाज आहे. ‘हलाल जिहाद’ या धोक्याविषयी समाजजागृती करण्याचे मोठे दायित्व आमच्यावर आहे. ‘जमियत उलेमा ए हिंद’ आणि अन्य संघटना असामाजिक तत्त्वांना साहाय्य करत आहेत. संख्याबळ आणि धार्मिक कट्टरतेच्या आधारे दडपशाही करून देशावर हलाल अर्थव्यवस्था लादली जात आहे. हिंदु समाजाला नष्ट करण्याचे षड्यंत्र यातून रचले जात आहे. याविषयी समाजात जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे असे कार्यक्रम वारंवार घेऊन समाजाला जागृत करावे लागेल. हिंदु जनजागृती समिती देशभरात मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवत आहे. माहेश्वरी समाजाचे कार्यकर्ते या लढ्यात आपल्या समवेत आहेत, असे आश्वासन मी देतो, असे प्रतिपादन श्री. शामसुंदर सोनी यांनी केले. ते अखिल भारतीय माहेश्वरी महासभा भवन येथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त आयोजित ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट, लोकजागृती मोर्चाचे अध्यक्ष अधिवक्ता रमण सेनाड उपस्थित होते.

हलाल जिहाद विरोधातील समितीचे अभियान अभिनंदनीय ! – अधिवक्ता रमण सेनाड, अध्यक्ष, लोकजागृती मोर्चा

अवैध भोंग्यांच्या विरोधात कृती करतांना हिंदु समाजात भीती आहे. सहिष्णू असणे, हे आपले बलस्थान आहे कि दुबळेपणा याचा विचार हिंदूंनी करावा. शासकीय व्यवस्थेतून या देशाचे कर्तेधर्ते मुसलमानच आहेत, हे बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हलाल जिहाद विरोधातील समितीचे अभियान अभिनंदनीय आहे. हिंदूंनी वीरश्री जागृत करून संघटित होऊन हलाल जिहादला विरोध करावा !

या वेळी श्री. सुनील घनवट यांनी हलाल जिहादच्या देशव्यापी षड्यंत्राची माहिती दिली, तसेच ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाचे महत्त्व विशद केले. ‘प्रत्येक हिंदूने जागरूक होऊन हलाल जिहादला विरोध करून हे षड्यंत्र हाणून पाडणे आवश्यक आहे’, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्त्या (सौ.) वैशाली परांजपे यांनी केले. समितीची यशोगाथा समितीचे नागपूर जिल्हा समन्वयक श्री. अतुल अर्वेन्ला यांनी कथन केली.

क्षणचित्रे

१. या कार्यक्रमाला ‘राष्ट्रीय युवा गठबंधन’चे श्री. राहुल पांडे, अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री. आनंद घारे आणि समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

२. कार्यक्रमात ‘मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम’ याविषयी चलचित्र दाखवण्यात आले.

३. उपस्थितांनी हलालच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निश्चय केला.

४. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घेतली.

५. श्री. शामसुंदर सोनी यांनी कार्यक्रमासाठी माहेश्वरी महासभेच्या मुख्य कार्यालयातील सुसज्ज सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.