भाग्यनगर येथील उपाहारगृहाला लागलेल्या आगीमध्ये ८ जणांचा मृत्यू

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील एका उपाहारगृहाला १२ सप्टेंबरच्या रात्री लागलेल्या आगीमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. उत्तर विभागाच्या पोलीस उपायुक्त चंदना दीप्ती यांनी सांगितले की, उपाहारगृहाच्या तळमजल्यावर इलेक्ट्रॉनिक स्कूटर रिचार्ज युनिट होते. इलेक्ट्रिक बाइक ठेवलेल्या तळघरात ही आग लागली. येथून आग पसरली. आगीने पहिला आणि दुसरा मजला जळून राख झाला. धुराचे लोट प्रचंड होते आणि गुदमरून लोकांना जीव गमवावा लागला.

पंतप्रधान मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि घायाळांना ५० सहस्र  रुपयांचे साहाय्य घोषित केले.