सर्व साधकांमध्ये भक्ती निर्माण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
कृष्ण म्हणा राम म्हणा वा आळवा जयंतावतारासी (टीप १) ।
पालनहारी श्रीविष्णु तोच या सर्व रूपांतूनी ।। १ ।।
असती सदैव आपुल्यासंगे ।
पहाती आपणा मागे-पुढे ।। २ ।।
साक्ष ती कैची मागता ।
संत अन् साधक हेच नेत्र तयांचे ।। ३ ।।
जाणती काय देणे योग्य साधका ।
कधीही जाऊ न देती विषाकडे (टीप २) ।। ४ ।।
करी अंतर्मुख प्रीती ऐसी त्यांची ।
वदती वाट सोडो नये आत्मचिंतनाची ।। ५ ।।
साधकांवरी प्रेम तयांचे ।
पडता-रडता उचलूनी घेण्या धावतसे ।। ६ ।।
गीतोपनिषद (टीप ३) दाविले भक्तां ।
गुरुकृपायोग साधनामार्गातूनी ।। ७ ।।
दाविले विश्वरूप अर्जुना कृष्णावतारी ।
संतशत (टीप ४) असती विश्वरूप जयंतावताराचे (टीप १) ।। ८ ।।
कोटीशः नमन तयांसी ।
न फेडू शके ऋण त्यांचे ।। ९ ।।
आलो शरण तुम्हासी ।
घ्यावे आता तव चरणी ।। १० ।।
हीच प्रार्थना एक तुम्हाला ।
तुम्हाविण काही सुचो नये मजला ।। ११ ।।
टीप १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
टीप २ – मायेकडे
टीप ३ – श्रीमद्भगवद्गीता
टीप ४ – सनातन संस्थेचे १०० संत
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.८.२०२२)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |