२ मुसलमान तरुणांकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

पोलिसांत तक्रार केल्यास संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी

 

अलीगढ (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील अलीगढ येथील बन्नादेवी पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे आरिफ आणि सुहेल या २ मुसलमान तरुणांनी तिच्या घरातून अपहरण केले. पोलिसांत तक्रार केल्यास संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली आहे.

पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ‘‘आरिफ आणि सुहेल यांचे केस कापण्याचे दुकान आहे. आरोपींचे आमच्या घरी येणे-जाणे होते. २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी आरिफ, सुहेल आणि त्यांची आई आमच्या घरी आले. त्यांनी माझ्या १७  वर्षांच्या मुलीला ‘बाजारातून सामान खरेदी करायचे आहे’’, असे सांगून बाजारात नेले. रात्री ८ पर्यंत माझी मुलगी घरी पोचली नाही. आम्ही आरिफला भ्रमणभाष केला. ‘मी मुलीला मुंबईला घेऊन जातो. मी तिचे धर्मांतर करून तिच्याशी लग्न करीन’, असे आरिफने आम्हाला सांगितले. ‘पोलिसांत तक्रार केल्यास संपूर्ण कुटुंबाला ठार मारू’, अशी धमकी आरिफने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध हिंदु तरुणींच्या विरोधात कारवाया करण्यास धजावतात. हे लक्षात घेऊन लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकारने अधिक कठोर पावले उचलावीत !