सनातन परंपरेच्या माध्यमातून भारताला ‘विश्‍वगुरु’ बनवू ! – योगऋषी रामदेवबाबा

रामदेवबाबा यांनी मदरशावर राष्ट्रध्वज फडकावला

हरिद्वार (उत्तराखंड) – योगऋषी रामदेवबाबा यांनी भारताच्या अमृतमहोत्सव वर्षपूर्तीच्या निमित्ताने १५ ऑगस्टला येथील बोदहेरी मोहिउद्दीनपूर गावातील एका मदरशावर राष्ट्रध्वज फडकावला. या वेळी ते म्हणाले की, पुढील २५ वर्षांमध्ये आम्ही  ‘सनातन परंपरे’च्या माध्यमातून भारताला ‘विश्‍वगुरु’ बनवणार आहोत. मदरशावर राष्ट्रध्वज फडकावल्यावर ते म्हणाले की, राष्ट्रीय एकता, अखंडता आणि संप्रभुता यांचा हा संगम आहे.

मदरशावर ध्वज फडकावल्यावरून विचारलेल्या एका प्रश्‍नावर रामदेवबाबा  म्हणाले, ‘‘ही आमची नवीन नाही, तर सनातन परंपरा आहे. या परंपरेच्या माध्यमातून आम्ही संघटितपणे राष्ट्राची एकता आणि अखंडता यांच्यासाठी, तसेच राष्ट्राचा गौरव अन् वैभव वाढवण्यासाठी कटीबद्ध आहोत. आम्ही सर्वजण एकत्र येऊन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापासून शताब्दी वर्षापर्यंत ‘सारे जहां से अच्छा’नुसार या भारताला मूर्त रूप देऊ. यामुळे भारत पुन्हा एकदा महाशक्ती, परम वैभवशाली, जगद्गुरु, विश्‍वगुरु आणि ‘सुपर पावर’ बनेल.’’