हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यात ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ मोहीम

नायब तहसीलदार महेश उभारे यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

सातारा – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’, ही मोहीम सातारा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस, प्रशासन, शाळा, महाविद्यालये, इतर शासकीय आणि निमशासकीय कार्यालय येथे याविषयीचे निवेदन देण्यात आले.

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या नावे नायब तहसीलदार महेश उभारे यांनी निवेदन स्वीकारले. कराड तालुक्यातील शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले, तसेच सातारा शहरासह जिल्ह्यातील ३० हून अधिक शाळा आणि २० हून अधिक महाविद्यालयांतही निवेदन देण्यात आले. या वेळी काही शाळा आणि महाविद्यालये येथे प्रबोधनपर प्रवचनेही घेण्यात आली. याला विद्यार्थी आणि शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.