६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. निरंजन चोडणकर यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. निरंजन चोडणकर यांच्याकडून साधिका कु. मानसी तिरविर यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. निरंजन चोडणकर

१. साधनेत साहाय्य करणे

कु. मानसी तिरविर

‘एखाद्या वेळी मला निराशा येते किंवा ताण येतो आणि माझ्या मनाचा संघर्ष होतो, तेव्हा निरंजनदादा स्वतःहून माझ्याशी बोलायला येतात. ते मला सांगतात, ‘‘निराश होऊन किंवा ताणात राहून साधनेचा वेळ वाया घालवण्यापेक्षा कुणाशी तरी बोलून घे. त्यामुळे तुझ्या साधनेला योग्य दिशा मिळेल. आता साधनेसाठी वेळ अत्यल्प आहे. आपल्याला विचारात राहून वेळ वाया घालवायचा नाही. तुला ‘निराशा आली आहे’, हे तुझ्या लक्षात आले, म्हणजे तू त्यावर मातही करू शकतेस.’’ त्यांच्या बोलण्यामुळे माझे मन शांत होते. दादांना ‘प्रत्येक साधक साधनेत लवकर पुढे जावा’, असे वाटत असते.

२. गुरूंप्रती भाव

दादा म्हणतात, ‘‘नेहमी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अनुसंधानात रहायचे.’’ ते सतत गुरूंशी सूक्ष्मातून बोलत असतात.

३. वर्तमानकाळात आणि आनंदी रहाणे

ते सतत वर्तमानकाळात रहातात. दादा नेहमी आनंदी आणि शरणागतभावात असतात.’

– कु. मानसी तिरविर (वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक