भारत-पाक सीमेवर पुन्हा दिसले पाकिस्तानी ड्रोन !

ड्रोनच्या साहाय्याने आतंकवाद्यांसाठी पुरवली जात आहेत शस्त्रास्त्रे !

प्रतीकात्मक छायाचित्र

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर २२ जुलैच्या रात्री कनाचक क्षेत्रामध्ये पाकच्या दिशेने आकाशात एक चमकणारी गोष्ट उडत असल्याचे दिसले. ते ड्रोन असल्याचे लक्षात आल्यावर सीमा सुरक्षा दलाने त्या दिशेने गोळीबार केला.

याआधी पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन गटांचा भांडाफोड केला होता. यामध्ये ७ सदस्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा, तसेच अन्य स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात आले. लष्कर-ए-तोयबाकडून ड्रोनच्या साहाय्याने जम्मू आणि राजौरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती क्षेत्रांमध्ये भारतीय सीमेत शस्त्रास्त्रे टाकली जात आहेत. ही शस्त्रात्रे एकत्र करून ती आतंकवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी हे तीन गट कार्यरत होते.

संपादकीय भूमिका

पाक वेगवेगळ्या मार्गांनी भारताच्या सातत्याने कुरापती काढत असल्याचे पुराव्यांसह सिद्ध होऊनही सरकार पाकविरुद्ध ठोस कारवाई का करत नाही ? , हे जनतेला पडणारे एक कोडेच आहे !