सांगली, २२ जुलै (वार्ता.) – लोकमान्य टिळक जयंतीच्या निमित्ताने भाजपचे प्रकाश बिरजे यांचे सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या वतीने २३ जुलै या दिवशी ‘लोकमान्य टिळक आणि शिवछत्रपती घराणे’ यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सायंकाळी ६.३० वाजता नगरवाचनालय सभागृह, राजवाडा चौक येथे होणार असून अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. ज्यांना वाचनालयाचे सभासद व्हायचे आहे, ते ६०० रुपये वार्षिक वर्गणी भरून सभासद होऊ शकतात, असेही वाचनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.