केजरीवाल यांच्याकडून गुजरातमध्ये विनामूल्य वीज देण्याचे आश्‍वासन !

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

कर्णावती (गुजरात) – या वर्षाच्या शेवटी गुजरात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यानिमित्ताने राजकीय नेत्यांचे राज्यात दौरे चालू झाले आहेत. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नुकतेच गुजरातच्या दौर्‍यावर आले होते. ते म्हणाले, ‘‘सध्या महागाई पुष्कळ वाढली असून विजेचा दरही वाढला आहे. आम्ही निवडून आल्यावर ज्याप्रकारे देहली आणि पंजाब येथे विनामूल्य वीज पुरवली, त्याप्रकारे गुजरातच्या जनतेलाही विनामूल्य वीज देऊ.’’

केजरीवाल पुढे म्हणाले की, देहली आणि पंजाब यांनुसार विजेसंदर्भात आम्ही पुढील ३ कामे करू :

१. सरकार बनवल्याच्या ३ मासांनंतर प्रत्येक कुटुंबाला ३०० यूनिट विनामूल्य वीज देऊ.

२. २४ घंटे वीज मिळेल आणि ती विनामूल्य असेल. वीज कापली जाणार नाही.

३. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतचे जुने घरगुती वीजेचे देयक माफ करू.

संपादकीय भूमिका

  • आज देशात प्रत्येक गोष्ट महाग होत चालली आहे. अशात विनामूल्य वीज देणे देशाला परवडणार तरी आहे का ? निवडणुकांकडे पाहून केजरीवाल यांच्यासारखे स्वार्थी आणि संधीसाधू नेते अशा प्रकारे अविचारी आश्‍वासने देऊन खरेतर जनतेची दिशाभूल करत आहेत, हे लक्षात घ्या !
  • कुठे जनतेला त्यागी बनवणारे पूर्वीचे तेजस्वी हिंदु राजे, तर कुठे जनतेला ‘हे विनामूल्य देऊ’, ‘ते विनामूल्य देऊ’ असे आमिष दाखवून त्यांना स्वार्थी बनववणारे हल्लीचे शासनकर्ते !