कल्याण येथे ज्येष्ठ शिवसैनिकावर आक्रमण !

ज्येष्ठ शिवसैनिक हर्षवर्धन पालांडे

ठाणे, २० जुलै (वार्ता.) – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कल्याण पूर्व येथील समर्थक, ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर २० जुलै या दिवशी सकाळी ४ ते ५ जणांनी आक्रमण केले. या आक्रमणात पालांडे हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी स्थानिक शिवसैनिक संतप्त आहेत. पुढील अन्वेषण चालू आहे.