शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस


मुंबई – शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) २८ जूनला सकाळी ११ वाजता अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याविषयी नोटीस पाठवली आहे. यामुळे संजय राऊत संतप्त झाले असून त्यांनी ‘महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी चालू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान चालू आहे. काही झाले, तरी मी गुवाहाटीचा (गौहत्तीचा) मार्ग स्वीकारणार नाही. या आणि मला अटक करा’, असे ट्वीट केले आहे. याच प्रकरणात ‘ईडी’ने यापूर्वी संजय राऊत यांची पत्नी सौ. वर्षा राऊत यांचे अन्वेषण केले होते.