कुवेतमध्ये नोकरीचे आमीष दाखवून विकण्यात आलेल्या केरळमधील ४ महिलांची सुटका

नवी देहली – कुवेतमध्ये नोकरीचे आमीष दाखवून विकण्यात आलेल्या केरळमधील ४ महिलांची काही सामाजिक संघटनांनी केलेल्या प्रयत्नानंतर सुटका करण्यात आली. एकूण ४ महिलांना परत आणण्यात आले असून त्यांनी याविषयी पोलिसांत तक्रार केली आहे. या तस्करीच्या प्रकरणातील प्रमुख मजीद देशातून पळून गेला आहे. मजीदचा सहकारी अजुमोन याला अटक करण्यात आली आहे. तो मजीदचा हस्तक म्हणून काम करत होता. कुवेतमध्ये विकण्यात आलेल्या या महिलांचा शारीरिक छळ करण्यात येत होता.

संपादकीय भूमिका

आखाती देशांमध्ये नोकरीसाठी जाणार्‍या भारतियांचा तेथे छळ केला जातो, हे अनेक वर्षे चालू आहे. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !