पू. राजाराम नरुटे यांच्या संतसन्मान सोहळ्यानंतर श्री. शंकर नरुटे यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. राजाराम नरुटे

१. संतसन्मान सोहळ्यानंतर पू. राजाराम नरुटे यांचे बोलणे, हसणे आणि वागणे यांत सहजता येणे

‘माझे वडील पू. राजाराम नरुटे (पू. आबा) यांचा संतसन्मान सोहळा झाल्यानंतर त्यांच्या वागण्यात सहजता आली आहे. ते परेच्छेने वागतात. ते लहान बाळाप्रमाणे सहजभावात रहातात. त्यांचे हसणे लहान बाळासारखे निर्मळ वाटते.

२. साधकांशी आनंदाने आवश्यक तेवढेच बोलणे

पू. आबांना ईश्वरपूरचे काही साधक भेटायला आले होते. ‘साधक भेटायला येणार आहेत’, असे कळल्यावर त्यांना फार आनंद होतो. ते साधकांशी सहजतेने बोलत होते. साधकांसाठी आवश्यक आहे, तेवढेच त्यांच्या मुखातून बोलले जात होते. साधकांना ‘तेथून उठायला नको. पू. आबांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटत होते.

श्री. शंकर नरुटे

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

३ अ. पू. आबा साधकांशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी बोलतांना पू. आबांची भावजागृती होते. ते साधकांना ‘प.पू. डॉक्टर ईश्वर कसे आहेत !’, याविषयी सांगतात.

३ आ. शंकरच्या बहिणीने पू. आबांना शंकरला ‘घरी परत कधी येणार ?’, असे विचारायला सांगितल्यावर पू. आबांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्यावर तो आश्रमातून घरी परत येईल’, असे सांगणे : मी घरून रामनाथी आश्रमात जाण्यासाठी निघतांना पू. आबांना नमस्कार केला. तेव्हा माझी बहीण पू. आबांना म्हणाली, ‘‘परत कधी येणार ?’, असे त्याला विचारा.’’ तेव्हा पू. आबा म्हणाले, ‘‘तो त्याचे कार्य करायला चालला आहे. परात्पर गुरु डॉक्टर सांगतील, तेव्हाच तो येईल.’’ त्यांचे बोलणे ऐकून माझा भाव जागृत झाला.

४. अनुभूती – पू. आबांच्या बोलण्यातून चैतन्य मिळून आध्यात्मिक लाभ होणे

पू. आबांच्या बोलण्यातून मला चैतन्य मिळते. ‘त्यांच्या सहवासात रहावे आणि त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे मला वाटते.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘एखाद्या जिवाचा साधनामार्ग कोणता आहे ?’, यापेक्षा ती साधना करून त्या जिवाला कसा आणि किती लाभ झाला ? त्या जिवाची उन्नती किती झाली ?’, हे जाणणारे आणि तो जीव साधनेत आणखी पुढे जाण्यासाठी त्याला दिशादर्शन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता !’

– श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.४.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक