मुखपट्टी (मास्क) न वापरल्यास विमान प्रवासावर बंदी ! – देहली उच्च न्यायालय

नवी देहली – कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. ते पुन्हा उद्भवू पहात आहे. अशा परिस्थितीत नियमांचे पालन न करणार्‍यांविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून दंड वसूल करावा. याखेरीज अशा लोकांना विमान प्रवासावर प्रतिबंध असलेल्यांच्या सूचीत (‘नो फ्लाय’ सूचीत) टाकावे, असा आदेश देहली उच्च न्यायालयाने दिला.

न्यायालयाने संबंधित सरकारी विभागांना आणि विमानात कार्यरत कर्मचार्‍यांना कारवाई करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.