पनवेल – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पनवेल येथून किरण इनामदार (वय ३४ वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना २० मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्या संदर्भात केलेली पोस्ट त्याने ‘शेअर’ केली होती. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. तो अलिबाग येथे लपून बसला होता. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.