|
संभाजीनगर – साडेतीन वर्षांपूर्वी एम्.जी.एम्. महाविद्यालयाच्या वसतीगृहातील एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात राहुल शर्मा या संशयिताला पोलिसांनी अटक केली; मात्र हत्या आणि बलात्कार असे आरोप सिद्ध करण्याइतके पुरावे पोलीस न्यायालयात देऊ शकले नाहीत. अन्वेषणातील त्रुटींवर बोट ठेवत अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. भीष्म यांनी १९ मे या दिवशी राहुल याची निर्दोष मुक्तता केली.
फिजिओथेरपीची ही विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहात होती. १० डिसेंबर २०१८ च्या रात्री खोली क्रमांक ३३४ मध्ये तिची हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी तिच्यावर अत्याचार झाल्याचे अन्वेषणात समोर आले होते. संपूर्ण मराठवाड्यात हे प्रकरण गाजले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून या ‘मुलीच्या खोलीत राहुल हाच रात्री आला होता’, असे सांगितले. पोलिसांनी उत्तर प्रदेशातून त्याला अटक केली होती.
संपादकीय भूमिकासर्व यंत्रणा हाताशी असतांनाही पोलिसांना आरोपीविरुद्ध पुरावे मिळत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे. पोलिसांचे अन्वेषण कुचकामी होत असल्याने खटल्यांतून आरोपींची निर्दाेष मुक्तता होते, याच नवल ते काय ! |