नाशिक – नाशिक रोड येथे महापालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाची ५ मजली इमारत बांधली आहे. त्यात सर्व रुग्णांच्या उपचारांसाठी लागणारे साहित्यही आहे. कोविडकाळात त्याचा उपयोग झाला. आता मात्र हे साहित्यच नव्हे, तर संपूर्ण इमारतच धूळखात पडली आहे. वापराअभावी सर्व वस्तू पडून आहेत. लोखंडी वस्तूंवर गंज चढत आहे, तर दुरुस्तीचा व्ययही वाढण्याची शक्यता आहे. या इमारतीत बिटको रुग्णालय स्थलांतरित करण्यात येणार आहे; मात्र त्याला अद्यापही मुहूर्त लागत नसल्याने या इमारतीतील साहित्य वापराविना पडून आहे.