विश्रामालयात ‘मधुचंद्र’ साजरा करण्याची अयोग्य पद्धत, तिचे दुष्परिणाम आणि नवदांपत्याला धर्मशिक्षणाची आवश्यकता

पू. तनुजा ठाकूर

१. पूर्वी नवविवाहित जोडप्याने प्रथम कुलदेवीच्या दर्शनासाठी जाणे आणि आताच्या नवविवाहित जोडप्याने मधुचंद्रासाठी बाहेर फिरायला जाणे

‘आजकाल एक अयोग्य प्रथा आरंभ झाली आहे. विवाहानंतर नवविवाहित जोडपे कुठेतरी फिरायला जाते. त्याला आजकाल ‘मधुचंद्र (हनिमून)’, असे म्हणतात. पूर्वीच्या काळी विवाहित जोडपे आपापली कुलदेवी किंवा इष्टदेवता यांच्या मंदिरात जात असे. ते ठिकाण त्यांच्या गावापासून पुष्कळ दूर असल्यास ते एखाद्या नातेवाइकाच्या घरी थांबत असत. याउलट आजकाल नवविवाहित जोडपे भूतबाधेने (नकारात्मक शक्तीने) ग्रासलेल्या विश्रामालयात (हॉटेलमध्ये) जाऊन वैवाहिक जीवनाचा शुभारंभ करतात. मॅकॉलेच्या आसुरी शिक्षणपद्धतीने सुशिक्षितांचा विवेक नष्ट केला आहे.

२. नैसर्गिक स्थळी विश्रामालयात साजरा करण्यात येत असलेल्या मधुचंद्राच्या प्रथेमुळे नवविवाहित दांपत्य आणि त्यांच्या पुढील पिढीची हानी होणे

हे सत्य आहे, ‘विवाह माता-पित्यांनी ठरवून दिलेल्या युवक किंवा युवती यांच्याशी झाला असेल, तर एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांनी काही काळ एकमेकांसह घालवला पाहिजे.’ आजकाल नवविवाहित जोडपी मधुचंद्रानिमित्त एखाद्या सुंदर नैसर्गिक स्थळी विश्रामालयात (हॉटेलमध्ये) रहातात. तेव्हा तेथील रज-तम प्रधान वास्तूमुळे त्यांची सूक्ष्म स्तरावर हानी होते. आजकाल काही विवाहबंधने मधुचंद्रानंतर लगेचच तुटतात किंवा त्यांच्यात वादविवाद चालू होतात. यातून ‘या मधुचंद्राच्या प्रथेमुळे नवविवाहित दांपत्याची किती हानी होते ?’, हे लक्षात येते; परंतु यापेक्षाही अधिक ‘ते आपल्या पुढील पिढीची किती हानी करतात ?’, हे पाहूया.

३. विश्रामालये भूतबाधेने ग्रासित असल्यामुळे एखाद्या महिलेला तेथे गर्भधारणा झाल्यास जन्माला येणाऱ्या बालकाला जन्मतःच वाईट शक्तींचा त्रास असणे

आजकाल बऱ्याच लोकांना पितृदोष (पितरांचा त्रास) आहे. त्यामुळे आज ५० टक्के बालकांना गर्भावस्थेपासूनच अतृप्त पितरांमुळे त्रास होतात. अशा परिस्थितीत विश्रामालयात एखादी महिला गर्भवती झाली, तर तिच्या गर्भाला वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता १०० टक्के असते. आज देश-विदेशांतील विश्रामालये (हॉटेल्स) भूतबाधेने ग्रासलेली असतात.

४. धर्मशिक्षण न मिळाल्यामुळे आजच्या नवदांपत्याला ‘सात्त्विक वास्तू, शुभ मुहूर्त, गर्भाधान संस्कार’, यांचे महत्त्व ठाऊकच नाही.’

– पू . तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ. (१२.११.२०२१)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्तींच्या प्रतिबंधासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.