जेरुसलेम (इस्रायल) येथील अल अक्सा मशिदीत इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी नागरिक यांच्यामध्ये हिंसाचार

१५० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक घायाळ

घटनास्थळ

जेरुसलेम (इस्रायल) – येथील अल-अक्सा मशिदीमध्ये पॅलेस्टिनी नागरिक आणि इस्रायली पोलीस यांच्यात झालेल्या हिंसाचारात १५० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक घायाळ झाले. ‘हा हिंसाचार कशामुळे झाला ?’, हे अद्याप समजू शकलेले नाही.

येथे सकाळी काही सहस्र मुसलमान नमाजासाठी मशिदीत जमले होते. तेव्हा इस्रायलचे पोलीसही मशिदीत आले. त्या वेळी पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेचे काही व्हिडिओही प्रसारित झाले आहेत. त्यात पॅलेस्टिनी नागरिक दगडफेक करतांना आणि पोलीस नागरिकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडतांना दिसत आहेत. या घटनेविषयी इस्रायली पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.