गायीच्या दुधामधील विशेष ‘प्रोटिन’मुळे कोरोनाचा विषाणू रोखता येतो ! – संशोधनातील निष्कर्ष

गायीच्या दुधाचे जे महत्त्व भारतातील लोकांना प्राचीन काळापासून ठाऊक आहे, ते संशोधकांना आता कुठे कळू लागले आहे ! – संपादक 

नवी देहली – भारतात कोरोनाच्या ३ लाटा येऊन गेल्यानंतर काही तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर गायीचे दूध प्यायल्याने कोरोनाचा संसर्ग नष्ट होण्यास साहाय्य होते, असे संशोधन झाले आहे. याचा अहवाल ‘जर्नल ऑफ डेअरी सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

‘युनिवर्सिटी ऑफ मिशिगन’ आणि ‘ग्लेनबिया पीएल्सी रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ यांच्या संशोधकांनी या अहवालात म्हटले आहे की, गायीच्या दुधामध्ये एक विशेष प्रकारचे ‘प्रोटिन’ सापडते जे कोरोना निर्माण करणार्‍या ‘सार्स-को-२’ या विषाणूंना रोखण्याचे काम करते. हे ‘प्रोटिन’ अनेक विषाणूंच्या विरोधात कार्य करते.