
सातारा, ५ मार्च (वार्ता.) – २ मासांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आली होती. या तक्रारीवरून युवकासह त्याच्या वडिलांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
९ जानेवारी या दिवशी खंडाळा तालुक्यातील एका गावातील एक १२ वर्षांची मुलगी दुकानात चालली होती. त्या वेळी त्याच गावातील एका युवकाने तिला मंदिरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला, तसेच ‘ही गोष्ट कुणाला सांगितलीस, तर तुला आणि तुझ्या कुटुंबियांना जिवे मारून टाकीन’, अशी धमकी दिली. ही घटना घडली त्याच दिवशी संबंधित तरुणाच्या वडिलांनी पीडित मुलीला ‘माझ्या मुलाशी लग्न कर, अन्यथा तुझ्या कुटुंबातील सर्वांना मारून टाकीन’, अशी धमकी दिली.
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !