हरियाणात ४ खालिस्तानी आतंकवाद्यांना अटक !

  • १ एके-४७, ३ विदेशी पिस्तुले यांसह अन्य अवैध शस्त्रास्त्रे जप्त !

  • पंजाब निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आक्रमण करण्याचे षड्यंत्र !

खलिस्तानी आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने आताच कठोर पावले उचलणे आवश्यक !

सोनीपत (हरियाणा) – पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी, म्हणजे १९ फेब्रुवारी या दिवशी येथील पोलिसांनी एका खालिस्तानी आतंकवादी गटाच्या ४ आतंकवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून १ एके-४७, ३ विदेशी पिस्तुले आणि अन्य अवैध शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. काही लोकांची हत्या करण्याचा त्यांचा कट होता.

खलिस्तानी समर्थक गटाकडून त्यांना अर्थपुरवठा केला जात होता. सागर उपाख्य बिन्नी, सुनील उपाख्य पहलवान, जतिन उपाख्य राजेश आणि सुरेंद्र अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या सर्वांच्या बँक खात्यांमध्ये लाखो रुपये असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राहुल शर्मा यांनी दिली.

आरोपी ‘खालिस्तान टाइगर फोर्स’ आणि ‘इंटरनॅशनल सिक्ख यूथ फेडरेशन’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनांच्या नेत्यांच्या संपर्कात होते.