एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१. एस्.एस्.आर्.एफ्. यू ट्यूब

१ अ. ‘गुरु कसे शोधावे ?’, या थेट प्रसारणाच्या (‘लाईव्ह स्ट्रीम’च्या) कार्यक्रमातून आम्हाला उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार ! मला नेहमी रात्री भीतीदायक स्वप्ने पडतात. मी गेल्या काही दिवसांपासून नामजप आणि मीठ-पाण्याचे उपाय करत आहे. त्यामुळे मला भीती वाटण्याचे प्रमाण ७० टक्के उणावले आहे; मात्र अजूनही मला तुम्ही मार्गदर्शन करा, जेणेकरून मी भीतीपासून मुक्त होऊन निर्भय राहू शकेन.’ – एक जिज्ञासू

१ आ. ‘एस्.एस.आर्.एफ्. यू ट्यूब’वरील चलचित्र पाहून नामजप केल्याने मला पुष्कळ साहाय्य झाले ! : ‘एस्.एस्.आर्.एफ्. यू ट्यूब’वरील ‘नामजप केल्याने व्यक्ती चिंता आणि भीती यांपासून मुक्त होते’, हे चलचित्र मी पाहिले. जेव्हा मला पुष्कळ भीती वाटत होती, तेव्हा मी नामजप केला. नामजप केल्याने मला पुष्कळ साहाय्य झाले. नामजप करण्याचे महत्त्व सांगितल्याबद्दल मी आपला आभारी आहे.’ – एकवॉज

२. एस्.एस्.आर्.एफ्. लाईव्ह चॅट

अ. ‘मी एस्.एस्.आर्.एफ्.चा एक घटक आहे’, याचा मला पुष्कळ अभिमान आहे. माझ्या मनातील भावना मी समाजात कोणाशीही व्यक्त करू शकत नाही; मात्र मी तुमच्याकडे त्या व्यक्त करू शकतो.’ – श्री. स्टेफन सुकुमार, भारत

(संकेतस्थळाला भेट देणारे जिज्ञासू ‘लाईव्ह चॅट’च्या माध्यमातून एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांशी संवाद साधू शकतात. – संकलक)

आ. ‘माझ्या लहान मुलीला असलेल्या आजाराच्या संदर्भात एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांकडून मिळालेल्या साहाय्यासाठी मी आभारी आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाची ध्वनीफीत (ऑडिओ’) मी लावून ठेवते. हळूहळू माझ्या मुलीमध्ये सुधारणा होत असून आज ती पूर्णतः बरी होत आहे. देवाप्रती आणि तुमच्याप्रती कृतज्ञता !’ – श्रीमती व्हिक्टोरिया, स्पेन

(‘श्रीमती व्हिक्टोरिया यांच्या मुलीला ‘इटींग डिसऑर्डर’ होता. या आजारात व्यक्तीला खाण्याच्या असामान्य सवयी असतात, उदा. काही व्यक्ती वजन वाढण्याच्या भीतीने जेवत नाहीत किंवा अधिक खाल्लेले उलटी करतात, तर काही भूक नसतांनाही पुष्कळ खातात. यावर नामजपादी उपाय म्हणून एस्.एस्.आर्.एफ्.ने त्या मुलीला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास सांगितला.’ – संकलक)

३. एस्.एस्.आर्.एफ्. इन्स्टाग्राम

३ अ. एस्.एस्.आर्.एफ्. हे माझे गुरु आहेत ! : ‘माझ्या आयुष्यात एस्.एस्.आर्.एफ्.ला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. एस्.एस्.आर्.एफ्. मला नेहमीच मार्गदर्शन करत असल्याने ते माझे गुरु आहेत. माझा हात न सोडल्याबद्दल, तसेच मला अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञ आहे.’ – श्रीमती प्रणाली शैलेश, भारत

४. ‘व्हॉट्सॲप’वर आलेला अभिप्राय

‘एस्.एस्.आर्.एफ्.चे ग्रंथ इतके अमूल्य आहेत की, विमानातून प्रवास करतांना मी ते माझ्याजवळ असणार्‍या पिशवीत (‘हँड लगेज’मध्ये) ठेवते, जेणेकरून ते कुठेही हरवणार नाहीत. – श्रीमती पौषाली बंधीपाध्या

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक