विदेशात ऐतिहासिक इमारतींचे संवर्धन कल्पकतेने हाताळण्याची रुढीबद्ध प्रथा आहे. आपल्याकडे दुर्दैवाने अजूनही पुरातन वास्तू जतन करणे, हाताळणे यांचे धोरण ना सरकारकडे आहे, ना खासगी संस्थांकडे ! अशी स्थिती हिंदु राष्ट्रात नसेल ! – संपादक
पुणे – राज्यातील गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री संकल्पकक्षाचे काम ठप्प झाले आहे. मे मासामध्ये राज्यातील दुर्ग संवर्धनात कार्यरत असणार्या संस्था, संघटना आणि कार्यकर्ते यांसह मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेत, गड-दुर्गांच्या संवर्धनाचा संकल्प केला होता; मात्र केवळ बैठकांचा सोपस्कार पार पडल्यानंतर संकल्पकक्षाद्वारे अद्याप कोणत्याही ठोस उपाययोजना आणि आराखडा घोषित करण्यात आलेला नाही.
यावर संकल्प कक्षाद्वारे ६ गड-दुर्गांच्या विकास आराखड्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची घोषणा येत्या शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) शिवनेरी गडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावी, अशी अपेक्षा जुन्नर येथील सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेचे संजय खत्री यांनी व्यक्त केली आहे.