विजयपूर, बागलकोट येथील श्री. मल्लिकार्जुन दळवाई आणि सौ. गीता शिवानंदा तोतड यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. श्री. मल्लिकार्जुन दळवाई यांना स्वप्नात ‘गुरुदेव दर्शन देणार आहेत’, असे सांगितल्याचे जाणवणे

श्री. मल्लिकार्जुन दळवाई

‘एकदा आम्ही सर्व कुटुंबीय रामनाथी, गोवा येथील आश्रमात गेलो होतो. तेव्हा आम्हाला ‘संध्याकाळी सत्संग आहे, असा निरोप मिळाला. त्यानंतर आम्ही सर्वांनी लवकर महाप्रसाद घेतला आणि सत्संगाला गेलो. त्या वेळी एक साधिका म्हणाली, ‘‘हा सत्संग हिंदी भाषेमध्ये आहे. तुमच्यासाठी उद्या सत्संग आहे.’’ तेव्हा माझ्या बाबांना (श्री. मल्लिकार्जुन दळवाई यांना) वाईट वाटले. खोलीत गेल्यावर ‘आज गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन झाले नाही’, असे मोठा भाऊ म्हणाला. १ घंट्यानंतर साधिकेने खोलीत येऊन ‘प्रार्थना करा’, असे सांगितले. प्रार्थना करतांनाच बाबांना झोप लागली आणि स्वप्नामध्ये बाबा गुरुदेवांच्या खोलीला नमस्कार करून ध्यानमंदिराकडे गेले. तेव्हा ध्यानमंदिरात बसल्यावर ‘गुरुदेवा, दर्शन द्या’, असे म्हटल्यावर एका साधिकेने त्यांना ‘तुम्हाला गुरुदेव दर्शन देणार आहेत’, असे सांगितल्याचे जाणवले.

२. हुब्बळ्ळी अधिवेशनाला गेले असतांना स्वप्नात गुरुदेव बोलत असल्याचे दृश्य दिसणे

मला ‘गुरुदेव कधी दर्शन देतील ?’, असे वाटत होते. स्वप्नात मला ‘गुरुदेव त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि सर्व साधकांशी बोलत आहेत’, असे दृश्य दिसले. त्या वेळी गुरुदेवांनी माझ्याशी बोलावे; म्हणून मी त्यांना ‘गुरुदेव’, असे म्हटले. तेव्हा त्यांनी विचारले, ‘‘तू कोण ?’’ आणि नंतर त्यांनी मला ओळखले. या स्वप्नामुळे माझी भावजागृती झाली.

सौ. गीता शिवानंदा तोतड

३. कृतज्ञता व्यक्त करतांना गुरुदेव डोक्यावर हात ठेवून गेल्याचे जाणवणे

एकदा वाचक संमेलन संपल्यावर गटचर्चा होती. गटचर्चेनंतर माझी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त होत होती आणि तिथल्या ग्रामदेवतेची पूजा चालू असतांनाही भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतांना ‘माझ्या डोक्यावर गुरुदेव हात ठेवून गेले’, असे जाणवले.’

४. कुकरचा स्फोट झाला, तरी गुरुकृपेमुळे आईला काहीच न होणे

घरी असतांना आई स्वयंपाक करत होती. तिने गॅसवर कुकर ठेवला आणि नामजप करत बसली. थोडासा नामजप झाल्यावर तिने वळून पाहिले, तर कुकरचा स्फोट झाला होता; परंतु गुरुकृपेमुळे आईला काहीच झाले नाही.

– कु. गीता दळवाई (आताच्या सौ. गीता शिवानंदा तोतड) , विजयपूर, बागलकोट, कर्नाटक. (१५.२.२०१८)