सनातनची अंबरनाथ (ठाणे) येथील युवासाधिका कु. साक्षी अहिर राष्ट्रभाषा सुबोध परीक्षेमध्ये मुंबई विभागातून पहिली !

आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारतांना कु. साक्षी अहिर

ठाणे, ३ जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्थेचे अंबरनाथ येथील साधक श्री. वीरेश अहिर यांची मुलगी आणि सनातनची युवासाधिका कु. साक्षी वीरेश अहिर हिला महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा यांच्या पुणे विभागांतर्गत घेण्यात येणार्‍या राष्ट्रभाषा सुबोध परीक्षेमध्ये सुयश मिळाले असून ती १५१ गुण मिळून मुंबई विभागातून पहिली आली आहे. ती अंबरनाथ येथील श्रीमती सुहासिनी प्रभाकर अधिकारी माध्यमिक विद्यालयामध्ये ८ व्या इयत्तेत शिकत आहे. कु. साक्षी अभ्यासाला बसण्यापूर्वी नामजप  करून बसत असे. या यशाचे श्रेय तिने भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले असून आई-वडील आणि शिक्षक यांचे अभ्यासात साहाय्य मिळाल्याचे कु. साक्षी हिने सांगितले. शाळेकडून आणि स्थानिक नगरसेविका अनिता आदक यांच्याकडून आयोजित कार्यक्रमात भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते कु. साक्षी हिचा सत्कार करण्यात आला.