चकमकीत ६ नक्षलवादी ठार  

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणा आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर सुरक्षादल अन् नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये ६ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीच्या ठिकाणावरून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तेलंगाणा पोलीस, छत्तीसगड पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.