श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केली आनंददायी घोषणा !

रामनाथी (गोवा), ६ डिसेंबर (वार्ता.) – राष्ट्र अन् धर्म यांच्याविषयी प्रेम असलेले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा ठेवून स्वतःत आमूलाग्र पालट करणारे आणि निरागस भावामुळे सर्वांना आपलेसे करणारे फोंडा (गोवा) येथील साधक श्री. लक्ष्मण गोरे (वय ८० वर्षे) सनातनच्या ११४ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंददायी घोषणा सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एका अनौपचारिक सोहळ्याद्वारे केली. या मंगलप्रसंगी पू. गोरेआजोबा यांचा भाव जागृत झाला. सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पू. गोरेआजोबा यांना पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.
या मंगल सोहळ्याला सनातनचे संत, तसेच श्री. लक्ष्मण गोरे यांच्या पत्नी सौ. मंगला गोरे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मुलगी सौ. गौरी आफळे, जावई श्री. वैभव आफळे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि नात कु. योगिनी आफळे यांच्यासह काही साधकही उपस्थित होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु एकता दिंडी’च्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे !
येत्या १५ दिवसांत येणार ‘माझा फ्लॅट’ योजना ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
२२ जूनपासून गोव्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज
बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्र मिळवणार्या अफगाणिस्तानच्या नागरिकाला अटक
क्रांतीदिनी हिंदु जनजागृती समितीने जुने गोवे येथील ‘हात कातरो खांबा’च्या ठिकाणी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती