|

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथील चौरी चौरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणार्या पंचायतीमध्ये रहाणार्या तालिम नावाच्या व्यक्तीने त्याच्या घरावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावला. याची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर येथे मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला. या जमावाने या घरावर दगडफेक चालू केली, तसेच शालिम याच्या वाहनाची तोडफोड केली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगवले. यासह तालिम, पप्पू, आशिक आणि आरिफ या चौघांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंद केला. त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
१. याविषयी ब्राह्मण जन कल्याण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कल्याण पाण्डे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. ते म्हणाले की, जर आरोपींना अटक झाली नाही, तर त्यांचे घर पाडण्यात येईल.
२. पोलिसांनी म्हटले की, सध्या चौकशी चालू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. त्याचा विदेशात कुणाशी संपर्क आहे का, हे पडताळण्यात येत आहे. तालिम याने लागवलेला झेंडा इस्लामचा झेंडा आहे कि पाकिस्तानचा ? याचीही चौकशी केली जात आहे.
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान