श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव !

कोल्हापूर, १० नोव्हेंबर (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजता सूर्यकिरणे महाद्वार येथे होती. यानंतर ५ वाजून २५ मिनिटांनी गणपति मंदिर, ५ वाजून ३५ मिनिटांनी सूर्यकिरणे उंबर्याच्या आत आली आणि ५ वाजून ४६ मिनिटांनी सूर्यकिरणे देवीच्या चरणांना स्पर्श करून डाव्या बाजूने लुप्त झाली.
या संदर्भात अधिक माहिती देतांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाइकवडे म्हणाले, ‘‘किरणोत्सव चांगला होण्यासाठी समितीच्या वतीने मार्गातील काही अडथळे हटवण्यात आले होते. उद्याही आणखी काही अडथळे काढण्यात येणार आहेत. भाविकांना हा किरणोत्सव चांगल्या प्रकारे पहाता येण्यासाठी मंदिराच्या दक्षिण द्वाराजवळ सध्या एक ‘डिजिटल स्क्रिन’ लावण्यात आली असून उद्यापासून मिरजकर तिकटी आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेही ‘डिजिटल स्क्रीन’ बसवण्यात येणार आहेत.’’
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !