नामजपादी उपायांमुळे रुग्णाईत आईच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने सौ. संकल्पा संदीप तांबे यांची गुरुमाऊलीवरची श्रद्धा वाढणे

श्रीमती शोभना घाडे

१. आईला रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवल्यावर गुरुमाऊलींच्या कृपेमुळे प्रत्येक कृती देवाला विचारून केल्याने तिच्यावर वैद्यकीय उपचार चालू होणे

‘११.१.२०१९ या दिवशी माझी आई श्रीमती शोभना घाडे (वय ७० वर्षे) अचानक आजारी पडल्याने तिला रुग्णालयात घेऊन गेले. तेथे तिला २ दिवस अतीदक्षता विभागात ठेवले होते. त्या वेळी गुरुमाऊलीच्या कृपेमुळे प्रत्येक कृती देवाला विचारून करण्याचा भाग होत होता. जेव्हा जेव्हा अडचण येत होती, तेव्हा प्रार्थना केल्यावर एखाद्या साधकाचे नाव सुचायचे आणि त्यांना विचारल्यावर ते सांगतील, तसे नामजपादी उपाय करता येत होते. अतीदक्षता विभागात स्थुलातून उपाय करता येत नव्हते; म्हणून एका साधिकेने ‘तू सूक्ष्मातून मानस मंडल काढ आणि आवरण काढ’, असे उपाय करण्यास सांगितले. ते केल्यानंतर आईवर वैद्यकीय उपचार चालू झाले. तिला अतिदक्षता विभागातून सर्वसाधारण विभागात हालवतांना डॉक्टर म्हणाले, ‘‘त्यांची उजवी बाजू जरा कमकुवत झाली असून त्यांच्या लहान मेंदूला रक्तपुरवठा होत नाही.’’

२. साहाय्यासाठी कुणी नसल्याने आईला घरी नेण्याचा प्रश्न उद्भवणे, श्रीकृष्णाचे चित्र लावून महर्षि अगस्ति आणि लोपामुद्रा यांना प्रार्थना करून मंत्र म्हटल्यावर तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागणे आणि त्यामुळे उपायांचे महत्त्व लक्षात येऊन आईला कोणताही किंतु न बाळगता घरी नेता येणे

सौ. संकल्पा तांबे

सर्वसाधारण विभागात स्थलांतरित केल्यावर आईच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. तिला घरी न्यायचे, तर तिला स्वतःला चालता येत नव्हते आणि घरी साहाय्यासाठी कुणीच नव्हते. त्यामुळे ‘तिला घरी कसे घेऊन जायचे ?’, असा प्रश्न होता. पुन्हा देवाला प्रार्थना करून एका साधकाला अडचण सांगितली. तेव्हा त्याने आईच्या कपाळावर श्रीकृष्णाचे चित्र लावायला सांगितले. रुग्णालयात श्रीकृष्णाचे चित्र लावणे शक्य नव्हते; म्हणून तिच्या डोक्याला बांधलेल्या रूमालामध्ये (स्कार्फमध्ये) श्रीकृष्णाचे चित्र लावले. नंतर महर्षि अगस्ति आणि लोपामुद्रा यांना प्रार्थना करून मंत्र म्हटल्यावर तिचे गरगरणे अन् बसल्यावर पडायला होणे, हे त्रास थांबले आणि तिला झोप लागली. (आधी तिला झोप लागत नव्हती.) त्यामुळे गुरुमाऊलीच्या चरणी पुन्हा कृतज्ञता व्यक्त होऊन श्रद्धा वाढली. श्रीकृष्णाच्या चित्रामुळे तिला पुष्कळ आध्यात्मिक लाभ झाला. ‘या उपायानेच तिला बरे वाटेल’, हे लक्षात आल्यावर आधुनिक वैद्यांनी ‘घरी नेण्यास अनुमती देतो’, असे म्हटल्यावर मनात कोणतेच विचार आले नाहीत. घरी गेल्यावर सर्वांसाठीचे उपाय (काळानुसार सर्वांनी करावयाचे आध्यात्मिक उपाय), खोक्यांचे उपाय, अत्तर अन् कापूर यांचे उपाय, तसेच कापराने आवरण काढणे इत्यादी उपाय तिच्याकडून करवून घेत होते. ‘तू केलेला नामजप तुझ्या शरिरात जात आहे’, असा भाव ठेवण्यास सांगून तिच्याकडून नामजप करून घेत होते. असे केल्यानंतर ती थोडीशी आधार घेऊन चालू लागली.’

– सौ. संकल्पा संदीप तांबे, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (२२.१.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक