स्थानिकांनी ३ आक्रमणकर्त्यांना पकडून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
‘बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने वाटचाल करत आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! – संपादक

दरभंगा (बिहार) – येथील राज संकुलामध्ये असणार्या कंकाली मंदिराचे पुजारी राजीवकुमार झा पहाटे साडेचार वाजता मंदिरात पूजा करत होते. त्या वेळी काही आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार केले. या गोळीबारात मंदिरात उपस्थित असलेला एक भाविकही घायाळ झाला. आक्रमणकर्ते पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना स्थानिकांनी ३ जणांना पकडले आणि त्यांना मारहाण केली. या मारहाणीत एक आक्रमणकर्ता ठार झाला, इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. एकूण ४ आक्रमणकर्ते चारचाकी गाडीतून मंदिरात आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार मंदिराच्या परिसरात अमली पदार्थांचे सेवन करणार्यांची गर्दी होते. त्यांपैकी एकाने दूरभाष करण्यासाठी पुजार्याच्या पुतण्याकडे भ्रमणभाष संच मागितला; मात्र त्याने तो दिला नाही. यावरून १३ ऑक्टोबरच्या संध्याकाळी पुजार्याच्या पुतण्याचे व्यसन करणार्यांसमवेत भांडण झाले होते. या वेळी पुजारी राजीवकुमार झा दोघांमधील वाद सोडवण्यासाठी गेले; पण हा वाद एकदम टोकाला गेला. याच वादामुळे झा यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू
Bangladeshi Infiltrators In Mumbai : मुंबईत पैसे घेऊन बांगलादेशी घुसखोरांना अभय !