रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या ऐरावत गजांच्या स्थापनेच्या वेळी आलेल्या अनुभूती

 

श्री. भूषण कुलकर्णी

१. इंद्रदेवता यज्ञातील आहुती स्वीकारत असल्याचे जाणवणे

‘१४.१.२०१९ या दिवशी ऐरावत गजांच्या स्थापनेच्या अनुषंगाने यज्ञ करण्यात आला. त्या वेळी पूर्णाहुतीच्या आधी देण्यात येणार्‍या शेवटच्या आहुतींचा इंद्रदेव स्वीकार करत असल्याचे जाणवले.

२. हत्तींच्या प्रतिकृती सजीव आणि भावयुक्त दिसणे

ऐरावत गजांच्या पूजेच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या दोन हत्तींच्या प्रतिकृती सजीव आणि भावयुक्त दिसत होत्या. सूक्ष्मातून त्यांच्या सोंडेत फुलांची माळ दिसत होती.

३. ‘यज्ञाच्या आहुती स्वीकारण्यासाठी सूक्ष्मातून इंद्रदेवता येत असल्याने सनातनच्या आश्रमाभोवती सूक्ष्मातून वज्रकवच निर्माण होत आहे’, असे दिसणे

‘यज्ञाच्या आहुती स्वीकारण्यासाठी सूक्ष्मातून इंद्रदेवता येत असल्याने सनातनच्या आश्रमाभोवती सूक्ष्मातून वज्रकवच निर्माण होत आहे’, असे दिसत होते. त्या वेळी मला परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाका यांची आठवण आली. परात्पर गुरु देशपांडेकाका यांनी स्वतः दधीचिऋषि होऊन ईश्वरी कार्य केले आहे.

४. आश्रमाच्या प्रवेशद्वारावर ऐरावत गजांची स्थापना झाल्यावर सूक्ष्मातून हत्तींची गर्जना ऐकू येणे

१५.१.२०१९ या दिवशी सकाळी आश्रमाच्या प्रवेशद्वारावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते ऐरावत गजांची स्थापना करण्यात आली. त्या वेळी दोन वेळा सूक्ष्मातून हत्तींची गर्जना ऐकू आली.’

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१.२०१९)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.