श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. परात्पर गुरुदेवांचे आज्ञापालन करणे, हीच खरी ईश्वरप्राप्ती !

‘भगवंताला काय हवे आहे ?’, हे गुरुदेवांना यथायोग्य (बरोबर) ज्ञात आहे. त्यामुळे गुरुदेव जे सांगतील, त्या गोष्टींचे आज्ञापालन करणे, म्हणजे खर्‍या अर्थाने ईश्वरप्राप्ती करण्यासारखेच आहे.

२. भगवंताच्या निर्गुण रूपाशी एकरूप होण्यासाठी नामाच्याही पलीकडे जाणे आवश्यक !

नाम म्हणजे शब्द आहेत. आरंभी देवाशी अनुसंधान साधण्यासाठी नामाची नितांत आवश्यकता असते; पण साधक साधनेत जसजसा पुढच्या टप्प्याला जातो, तसा त्याचा प्रवास सगुणातून निर्गुणाकडे चालू होतो. तेव्हा नामाचे निर्गुण रूप असलेल्या भगवंताशी एकरूप होण्यासाठी प्रयत्नरत असावे. शेवटी नाम म्हणजे सगुण शब्दच आहेत. शब्दांच्याही पलीकडे जाता आले पाहिजे. नाम हे विचारांचे एक दैवी स्वरूप आहे. शेवटी गुरु शिष्याला नामाच्याही पलीकडे नेतात. निर्गुणात केवळ ईश्वरप्राप्तीचा ध्यास उरतो. पुढेपुढे तेही उरत नाही, म्हणजेच शून्यावस्था येते.

३. चित्ताच्या पटलावर काहीही संस्कार नसणे, म्हणजेच निर्गुण स्थिती होय !’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२०१८)