मुसलमान प्रेमिकेच्या कुटुंबियांनी हत्या केल्याचा मुलाच्या कुटुंबियांचा आरोप
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक आहे. जर हिंदु युवकाची धर्मांधांकडून हत्या झाली असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक

देहली – येथील हैदरपूर परिसरात रहाणार्या १७ वर्षीय आलोक कुमारचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. ‘मुसलमान मुलीच्या कुटुंबियांनी आमच्या मुलाला मारून त्याचा मृतदेह झाडावर लटकवला’, असा आरोप मृत मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीमध्ये याला आत्महत्या म्हटले आहे. या घटनेच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केले असून आलोक कुमार याला न्याय देण्याची मागणी केली आहे.
१. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या माहितीनुसार, आलोक याचे एका मुसलमान मुलीशी प्रेमसंबंध होते. त्या मुलीच्या कुटुंबाचा या संबंधाला विरोध होता.
२. आलोकचे वडील हरिराम यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा १७ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. त्या मुलीने आलोकला तिच्या घरी बोलावले होते. तेव्हा तिने त्याला भ्रमणभाष संच घरीच ठेवून येण्यास सांगितले होते. ‘आलोकने त्याच्या कुटंबाला सोडून त्यांच्या मुलीशी लग्न करावे’, असे मुलीच्या कुटुंबियांचे म्हणणे होते; मात्र आलोकला ते मान्य नव्हते.
३. ज्या दिवशी आलोक बेपत्ता झाला, त्याच दिवशी मुलीच्या वडिलांनी आलोकला धडा शिकवण्याची धमकी दिली होती, असेही समजते.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !