
कराड, १२ सप्टेंबर – काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार पी.एन्. पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा राजेश आणि मुलगी सौ. टीना अशा तिघांवर सुनेचा छळ करून १ कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या संदर्भात आमदार पी.एन्. पाटील यांची सून आदिती राजेश पाटील यांनी तक्रार दिली आहे.
सुनेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आमदार पी.एन. पाटील यांच्यावर गुन्हा दाखलhttps://t.co/FsrvbV2AUi #pnpatil #complaint #torture
https://t.co/xwM1QRbaXM— Maharashtra Times (@mataonline) September 12, 2021
सध्या आदिती या कराड येथे त्यांचे वडील सुभाष पांडुरंग पाटील यांच्याकडे वास्तव्यास आहेत. आदिती यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सासरे आमदार पी.एन्. पाटील, पती राजेश आणि नणंद सौ. टीना यांनी संगनमताने माझा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्रास दिला. या सर्वांनी फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे असे प्रकार केले आहेत. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांवर गुन्हा नोंद झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातार्यासह राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !