उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. मल्हार अरविंद कौसडीकर हा एक आहे !
१. प्रेमभाव
‘मल्हारमध्ये प्रेमभाव आहे. घरातील कुणाचाही वाढदिवस असेल, तर ‘त्याला काय भेटवस्तू देऊ ? कसे नियोजन करू ? ज्यामुळे ती व्यक्ती आनंदी होईल’, असा त्याचा विचार असतो. स्वतःला आवडणार्या वस्तूही तो इतरांना सहज देतो.
२. इतरांना साहाय्य करणे
मल्हार मला सेवेत, तसेच घरकामांत साहाय्य करतो. घरातील साहित्य आवरणे, स्वतःची खोली आणि अभ्यासाचे पटल आवरणे, घरातील लादी पुसणे इत्यादी कामे तो करतो. मी घरी नसतांना तो घराकडे लक्ष ठेवतो आणि ईशानलाही (लहान भावालाही) सांभाळतो.
३. मिळून मिसळून रहाणे
मल्हार शाळेत मिळून मिसळून रहातो आणि सर्वांना साहाय्य करतो. ‘तो मेहनती आहे’, असे त्याच्या शिक्षकांनी सांगितले आहे. शाळेतील खोड्या करणार्या मुलांमध्ये तो मिसळत नाही.
४. शास्त्रीय संगीताची आवड
मल्हार ‘पियानो’ या वाद्यावर शास्त्रीय संगीत वाजवायला शिकत आहे. त्यावर तो प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनाच्या धून वाजवतो.
५. साधनेचे प्रयत्न
अ. मल्हार नियमित नामजप करतो, तसेच गणपतिस्तोत्र, मारुतिस्तोत्र आणि रामरक्षा यांचे पठण करतो.
आ. या दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेला ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग मल्हार नियमित ऐकतो. वर्गात सांगितल्यानुसार त्याने कृतीच्या स्तरावरील प्रयत्न वाढवले आहेत.
६. एका संतांनी मल्हारचे केलेले कौतुक
एकदा तो रामनाथी आश्रमात आला असतांना एका संतांशी बोलला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आजच्या पिढीतील मुले किती आत्मविश्वासाने बोलतात !’’ त्यांनी त्याला खाऊही दिला.
७. स्वभावदोष
आळशीपणा, राग येणे आणि नियोजनाचा अभाव.
८. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, मल्हारची पुढची साधना तुम्हीच करवून घ्या. तुमचा कृपाशीर्वाद सदैव आमच्यावर असू दे’, अशी प्रार्थना आहे.
‘हे लिखाण गुरुदेवांच्या कृपेने झाले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. प्राची कौसडीकर (आई), कोलशेत (जिल्हा ठाणे). (२७.५.२०२०)
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |