(म्हणे) ‘मुले आणि मुली यांचे शिक्षण वेगवेगळे झाले पाहिजे !’

‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष अरशद मदनी यांचे आवाहन !

  • महिलांनी बुरखा घालण्याचे समर्थन करतांना, ‘पुरुषांच्या वाईट दृष्टीपासून वाचण्यासाठी महिलांना बुरखा घालण्यास सांगितले जाते’, असे इस्लामी अभ्यासकांकडून सांगितले जाते. असे असले, तरी ‘मुसलमान महिलांवर त्याच समाजातील लोकांकडून लैंगिक अत्याचार का होतात ?’ या प्रश्‍नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही ! तसेच ५ बायका करण्याचेही स्वातंत्र्य आहे, हेही येथे लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक
  • त्यामुळे अनैतिकता दूर करण्यासाठी मुले आणि मुली यांना स्वतंत्र शिक्षण देणे, हा पर्याय नसून मूळ वासनांध वृत्तीत पालट होणे आवश्यक आहे. ती घालवण्यासाठी मदनी यांनी त्यांच्या धर्मियांना आवाहन केले पाहिजे ! – संपादक
‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष अरशद मदनी

नवी देहली – अनैतिक आचरणापासून दूर रहाण्यासाठी मुले आणि मुली यांचे शिक्षण वेगवेगळे झाले पाहिजे, असे आवाहन ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष अरशद मदनी यांनी केले आहे. मदनी यांनी मुसलमानेतरांनाही हे आवाहन केले आहे. त्यांच्या संघटनेच्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.