‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या देशद्रोह्यांना तात्काळ अटक करा ! – हिंदु जनजागृती समिती

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून का कारवाई करत नाहीत ? – संपादक

भोपाळ – १५ ऑगस्टच्या दिवशी इंदूर येथील नेताजीनगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये आणि उज्जैन येथे मोहर्रमच्या वेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. हे अतिशय गंभीर असून देशाची अंतर्गत सुरक्षा आणि मध्यप्रदेशची शांतता यांसाठी धोकादायक आहे. उज्जैन प्रकरणामध्ये ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले आहेत, ते ११ जण अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, उज्जैन हिंदूंची प्राचीन नगरी असून तेथे जगप्रसिद्ध श्रीमहाकालच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक येत असतात. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान महाकालच्या नगरीमध्ये अशा प्रकारच्या घोेषणा देऊन जाणीवपूर्वक हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्या गेल्या आहेत. ‘एकीकडे कोरोना महामारीच्या नावावर हिंदूंचे धार्मिक उत्सव साजरे करण्यावर बंदी येत आहे, तर दुसरीकडे अल्पसंख्यांकांना त्यांचे उत्सव साजरे करण्यासाठी पूर्ण मोकळीक का दिली जात आहे ?’ असा प्रश्‍न हिंदूंना पडणे स्वाभाविक आहे. केरळ येथे ईदच्या वेळी निर्बंध शिथिल केल्यामुळे तेथे कोरोना रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली. या पार्श्‍वभूमीवर ‘कोरोना महामारीच्या काळात उज्जैन येथे मोहर्रमच्या निमित्ताने फेरी काढण्याची अनुमती संबंधितांनी घेतली होती का ?’ याचीही चौकशी झाली पाहिजे.