सरकारने काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला ‘धार्मिक नरसंहार’ घोषित करायला हवे ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्मीर

श्री. राहुल कौल

हिंदू हा काश्मीरचा मूळ निवासी आहे. काश्मिरी हिंदूंनी गेल्या ३२ वर्षांत धार्मिक नरसंहाराला तोंड दिले आहे. त्यांना धर्मांधांकडून लक्ष्य केले जाते; कारण काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करणे आणि तेथील मूळ नागरिकांना मुळातून उखडून फेकणे, हा त्यांचा उद्देश आहे. हिंदूंची सभ्यता, त्यांचे धर्मावर असणारे प्रेम, निष्ठा आणि श्रद्धा त्यांना संपवायची आहे. या नरसंहाराकडे आताची राजकीय प्रणालीही दुर्लक्ष करत असल्याने त्याला राजाश्रय मिळत आहे. काश्मीरमधील प्रशासन हे सरळ सरळ जिहादींना प्रोत्साहन देत आहे. तेच हिंदूंच्या नरसंहाराला उत्तरदायी आहेत. काश्मीरमधील नरसंहार धार्मिकच आहे. वर्तमान सरकारने काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला ‘धार्मिक नरसंहार’ घोषित करायला हवे.