मुंबईकर गर्दी करत राहिले, तर कठोर निर्णय घ्यावा लागेल ! – महापौर

किशोरी पेडणेकर

मुंबई – कोरोनाच्या धर्तीवर लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली; मात्र मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागल्याने पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी चेतावणी महापौर डॉ. किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चेतावणीचे नागरिकांनी पालन करावे. या परिस्थितीमध्ये नागरिकांचे सहकार्य मिळणे अपेक्षित असून तसे होत नसल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल. सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि त्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राज्य शासन आढावा घेत आहेत. त्यामुळे निश्‍चितच यावर मार्ग काढण्यात येईल, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

मुंबईमध्ये सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सर्व अत्यावश्यक आणि बिगर अत्यावश्यक दुकाने चालू रहातील. दुकाने चालू करण्यासाठी सम-विषम संकल्पना वापरण्यात आली आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, तर दुसर्‍या बाजूची दुकाने मंगळवार आणि गुरुवार अशी चालू रहातील. शनिवार आणि रविवार आवश्यकतेनुसार दुकाने बंद रहातील.